Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

करोना रुग्णांना ठेवण्यासाठी लवासा ताब्यात घ्या- खासदार गिरीश बापट

पुणे – करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून नव्या रुग्णांना सामावून घेण्याचा प्रश्न जटील बनला आहे. यावर उपाय म्हणून लवासा शहर ताब्यात घ्या आणि त्याचं कोविड सेंटरमध्ये रूपांतर करा,’ असा सल्ला भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आतापर्यंत ८० हजारच्या पुढं गेली असून १८८५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या ४८,९८४ रुग्णांवर उपचार सुरू असून ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे. रोजच्या रोज वाढणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याचं आव्हान जिल्हा प्रशासनापुढं आहे. जिल्हा प्रशासन शाळा, खासगी रुग्णालये व हॉटेल ताब्यात घेत आहे.

ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन खासदार बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं असून लवासा ताब्यात घेण्याची सूचना केली आहे. लवासामध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या अनेक इमारती आहेत. त्या वापराविना पडून आहेत. ज्या तालुक्यात लवासा वसले आहे, त्या मुळशी तालुक्यातही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळं हे शहर ताब्यात घेऊन त्याचं क्वारंटाइन सेंटरमध्ये रूपांतर करणं योग्य ठरेल. तिथं मोठ्या संख्येनं बेड्स उपलब्ध करून देता येतील, याकडं बापट यांनी लक्ष वेधलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button