हृतिक रोशनकडून १०० बॉलिवूड डान्सर्सना मदत

हृतिक रोशनकडून १०० बॉलिवूड डान्सर्सना मदत

मुंबई – कोरोनाच्या काळात सर्वांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहेत. त्यातच कलाक्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना आर्थिक संकटांना सामना करावा लागत आहे. विविध चित्रपटात बॅकग्राऊंड डान्सर्स म्हणून काम करणाऱ्या डान्सर्सना हृतिकने आर्थिक मदत केली आहे.

जवळपास १०० बॅकग्राऊंड डान्सर्सच्या खात्यात हृतिकने पैसे ट्रान्सफर केले आहेत. बॅकग्राऊंड डान्सर्सचा समन्वयक असलेला राज सुराने यांनी याबाबत माहिती दिली. ‘सर्व डान्सर्स हृतिकचे आभार मानत आहेत. त्याने या पडत्या काळात मदत केल्याबद्दल त्याचे मनापासून आभार.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *