रेल्वेशी संबंधित सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची माहिती, हा नवा नियम सर्वांसाठी होणार लागू

रेल्वेशी संबंधित सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची माहिती, हा नवा नियम सर्वांसाठी होणार लागू

मुंबई : कोरोना विषाणू या साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी भारतीय रेल्वे सुरक्षेच्या सर्व नवीन उपायांचा अवलंब करण्यााच निर्धार केलेला आहे. कोविड-१९च्या परिस्थितीत तिकीट काउंटर आणि लोकांपासून कमी संपर्क साधण्यासाठी रेल्वेत नवीन नियम लागू केला जाणार आहे. भारतीय रेल्वेने सर्व रेल्वे तिकिटांमध्ये क्यूआर कोड सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

लवकरच आपल्याला रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी फक्त तिकिट नसून केवळ क्यूआर कोड आवश्यक असणार आहे. विमानतळांप्रमाणेच रेल्वेत देखील क्यूआर कोडसह कॉन्टॅक्टलेस तिकिटे देण्याचे विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. रेल्वे स्टेशन आणि रेल्वेमध्ये मोबाइल फोनवरून स्कॅन करता येणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी सांगितले की सध्या रेल्वेची ८५ टक्के तिकिटे ऑनलाईन बुक केले जात आहेत आणि काउंटरवरून तिकिटे खरेदी करणाऱ्यांसाठी क्यूआर कोडची व्यवस्था केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *