Breaking-newsराष्ट्रिय

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या घरी ईडीची छापेमारी

Share On

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण अस्थिर आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये सध्या राजकीय वर्तुळात गोंधळ सुरू असताना आता आणखी एक नवी बाब समोर आली आहे. अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. कथित खत घोटाळा प्रकरणी ईडीकडून हा छापा टाकण्यात आला आहे. यात अशोक गेहलोत यांचा भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या कंपनीचाही समावेश आहे. अग्रसेन यांची मालकी असणाऱ्या सर्व ठिकाणी ईडीकडून छापे टाकले जात आहेत.

जोधपूरमधील अनुपम कृषी कंपनी अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या मालकीची आहे. कस्टम विभागाने खटला चालवत कंपनीवर ७ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. ईडीकडून राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button