Breaking-newsताज्या घडामोडी

धक्कादायक! वाईत मध्यरात्री घरात घुसून महिलेवर चाकूने वार; लाखो रुपयांची चोरी

येथील पेटकर कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून चाकूने वार करून सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम अशी सव्वादोन लाख रुपयांची चोरी केल्याची घटना घडली. वाई पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गौरी सूर्यकांत वंजारी (पेटकर कॉलनी) या प्रणव आटर्स शेजारी सर्वानंद नगर येथे कुटूंबासह राहतात. त्यांचे पती नोकरीनिमित्त रात्री कामावर गेले होते. त्यांच्या घराला दिरांनी बाहेरून कुलूप लावले होते. मात्र, आतून कडी लावायला त्या विसरल्या होत्या. मध्यरात्री दोनच्या सुमारास घराचा कुलूप कोयंडा तोडून २५ ते ३० वयोगटातील दोन तरुण घरात घुसले होते. त्यांना अचानक जाग आली तेव्हा एक जण दरवाज्यात उभा असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने त्यांच्या हातावर चाकू मारला आणि गळ्यातील छोटे गंठण व स्टोपजोड काढून घेतले.

नंतर त्यांनी कपाटाची चावी मागितली. चावी देण्यास नकार देताच हातातील हत्याराने कपाट तोडून कपाटातील नेकलेस, चेन, स्टोपजोड, गंठन असे आठ तोळे सोन्याचे-चांदीचे दागिने, बारा हजार रुपये रोख असा सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज घेऊन ते पसार झाले. चोरटे गेल्या नंतर जोरजोरात हाका मारून गौरी यांनी आपल्या दिरांना बोलावले व नंतर पोलिसात तक्रार दिली. त्यांनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. या घरात चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी शेजारचे मोकळे घर फोडले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वानांने घटनास्थळापासून औदयोगिक वसाहत रस्त्यापर्यंत माग काढला. पोलिसांनी शेजारच्या ओढ्यातून चोरट्यांनी पळवलेली पर्स ताब्यात घेतली. पोलिसांनी चारही बाजूला नाकाबंदी केली असून सराईत चोरट्यांचा शोध सुरु आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button