Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिड लाखांच्या पार

नवी दिल्ली | देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 51 हजारांपेक्षा जास्त झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी आकडेवारी अपडेट केली. यानुसार आता देशात एकूण रुग्णांची संख्या ही 1 लाख 51 हजार 767 रुग्ण आहेत. यामधील 4 हजार 337 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 64 हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत.

देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 6 हजार 387 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता देशात 83 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केस आहेत. महाराष्ट्रात एकूण संक्रमितांचा आकडा 54 हजार 758 एवढा झाला आहे. यामधील 1792 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर तामिळनाडूमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 17 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. येथे आतापर्यंत 127 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूनंतर गुजरातमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वात जास्त पसरत आहे. आता येथे एकूण रुग्णांची संख्या 14 हजार 821 झाली आहे. यामधील 915 जणांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीमध्येही एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 14 हजार 465 एवढा झाला आहे. येथे आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात संक्रमण झपाट्याने वाढत आहे. राजस्थानमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या 7536 एवढी आहे. यामध्ये 170 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर मध्य प्रदेशात एकूण रुग्णांचा आकडा 7024 एवढा आहे. यामध्ये 305 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात एकूण कंफर्म केसेसची संख्या 6548 एवढी आहे. यामध्ये 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये रुग्णांचा आकडा 2983 आहे. यामध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button