Breaking-newsराष्ट्रिय

#CoronaVirus:नववधु कोरोना पॉझिटिव्ह, नवऱ्यामुलासाह ३३ जण क्वारंटाईन

भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक नववधू लग्नानंतर तीन दिवसांतच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. नववधूला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता नवऱ्यामुलासह 33 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. नववधूला उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. हा लग्नसोहळा 18 मे रोजी पार पडला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीची तब्येत गेल्या काही दिवसांपासून खराब होती. 7 दिवसांपर्यंत ताप जात नसल्याने मुलीने कोरोना चाचणी केली होती. त्याचदरम्यान तीच लग्न झालं.

लग्नानंतर बुधवारी तिचा कोरोनाचा रिपोर्ट आला. मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला फोन करुन तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. त्यानंतर भोपाळमधील एम्स रुग्णालयात मुलीला दाखल करण्यात आहे. नवऱ्यामुलासह 33 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group