#CoronaVirus: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; खबरदारीच्या सूचना

#CoronaVirus: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; खबरदारीच्या सूचना

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एक पोलीस अधिकारी करोनाबाधित आढळल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देहूरोड परिसरात राहणाऱ्या एका पोलिसाला करोनाची लागण झाली होती. पोलीस आयुक्तालयातच करोनाचा शिरकाव झाल्याने योग्य ती खबरदारी घेतली जात असून करोनाबाधित पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *