#Waraginestcorono:बचाव शक्य आहे की नाही; किट सांगणार 20 मिनिटांत, ऑक्सफर्ड संशोधकांना किट बनवण्यात यश

लंडन. ऑक्सफर्डच्या संशोधकांनी २० मिनिटांत निष्कर्ष सांगणाऱ्या अँटिबॉडी टेस्ट किट तयार करण्यात यश मिळवले आहे. एखादी व्यक्ती किती संसर्ग सहन करू शकते हे अचूकपणे सांगणारे हे किट आहे. ब्रिटन सरकारने असे ५ कोटी किट बनवण्याची ऑर्डर दिली आहे.
सूत्रांच्या मते, या किटचे उत्पादन या वर्षी जूनपासून सुरू होईल. दर आठवड्यात १० लाख किट बनवण्याचे लक्ष्य आहे. त्यानुसार पुढील वर्षापर्यंत ५ कोटी किट तयार होतील. या किटचा तपासणी खर्च ९४५ रुपये असेल. त्यामुळे इम्युनिटी टेस्ट करण्याची पद्धतही सोपी होऊ शकेल. त्यासाठी किटवर निश्चित ठिकाणी रक्ताचे थेंब टाकले जातील. तेथे २० मिनिटांनंतर दोन रेषा दिसल्यास व्यक्तीमध्ये संसर्गापासून बचाव करणारी प्रतिकारशक्ती आहे. एक रेषा दिसल्यास व्यक्ती संसर्गात अडकू शकते, असा त्यांचा अर्थ असेल. कधी कधी एक रेषा म्हणजे टेस्ट अयशस्वी ठरली असाही अर्थ असू शकतो. या तपासणीनंतर रुग्ण आपला अहवाल सेंट्रल युनिटला पाठवू शकतो. त्यावर सेंट्रल युनिट निर्णय घेईल.




