Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: GoodNews! डहाणूतील तीन वर्षांच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात

करोना व्हायरसचा सर्वत्र थैमान सुरु असताना पालघर जिल्ह्यातून एक दिलासादायक वृत्त आलं आहे. पालघरमध्ये करोनामुक्त झालेल्या एका तीन वर्षांच्या चिमुकलीला रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. यासोबतच ही चिमुकली करोनामुक्त होणारी पालघर जिल्ह्यातील पहिली व्यक्ती ठरली आहे.

वृत्तानुसार, डहाणू तालुक्याच्या गंजाड परिसरातील दसरापाडा येथील तीन वर्षीय मुलगी करोनामुक्त झाल्याने रविवारी तिला घरी सोडण्यात आले. यावेळी तिच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून तिला आनंदी वातावरणात निरोप दिला. “चिमुकलीची तीन वेळेस चाचणी घेण्यात आली. तिन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच करोनामुक्त होणारी ही जिल्ह्यातील पहिली व्यक्ती ठरली”, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button