पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या रमजानच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या रमजानच्या शुभेच्छा

नवी दिल्ली | रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झालीय. देशातील अनेक भागांत मुस्लीम बांधव शनिवारपासून रोजा पाळायला सुरुवात करतील. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आणि मुस्लीम समुदायाला रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोबतच यावेळी पंतप्रधानांनी कोविड-१९ विरुद्ध लढाई विजय मिळवण्याचा विश्वासही व्यक्त केला.’रमजान मुबारक! मी सगळ्यांच्याच सुरक्षा, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो. हा पवित्र महिना दयाभाव, सुसंवाद आणि करुणेच्या प्रचाराचा ठरवा. कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत आपल्याला विजय मिळो आणि एक आरोग्यदायी विश्व निर्माण होवो’ असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *