Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: Good News: ‘या’ राज्याने केली कमाल, चार दिवसांत आढळला नाही एकही कोरोना रुग्ण

एकीकडे देशात रोज हजारावर करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातही रोज शंभरावर करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. मात्र देशात एक राज्य असं आहे ज्या राज्यात गेल्या चार दिवसांत एकही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही.
हे राज्य आहे उत्तराखंड. या राज्यात चार दिवसांपूर्वी करोना रुग्णांची संख्या ३५ होती. रविवारी संध्याकाळपर्यंत ही संख्या कायम राहिली आहे. गेल्या चार दिवसांत एकही करोना संशयित येथे पॉझिटिव्ह आढळला नसल्याची माहिती उत्तराखंडच्या आरोग्य खात्याने दिली आहे.
No new positive case in the state for the fourth day in a row. The total number of cases in the state remains at 35: Uttarakhand Health Department
— ANI (@ANI) April 12, 2020




