Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#War Against Corona : पोलिसांना पूर्वकल्पना न देता धार्मिकस्थळावर राहणाऱ्या १३ जणांवर गुन्हा

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका मशिदीत कुठलीही पूर्वकल्पना न देता राहणाऱ्या 13 जणांसह संबंधित मशिदीच्या ट्रस्टमधील व्यक्तींवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित 13 व्यक्ती या रांची येथून आल्या असून त्या दोन महिन्यापासून मशिदीत राहत होत्या. त्यांच्यावर 13 कलम 188 , तसेच साथीचा रोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोवीड 19 अंमलबजावणी कायदा कलम 21 नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे म्हणाले, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचा दिल्लीतील घटनेशी कोणताही संबंध नाही. त्या मशिदीच्या कामानिमित्ताने फेब्रुवारी मध्ये पुण्यात आले आहेत. त्यानंतर लॉकडाऊन झाल्यावर त्यांना पुन्हा आपल्या गावी जाणे शक्य झाले नाही. मात्र त्या व्यक्ती मशिदीत थांबल्या आहेत. याची माहिती पोलीस प्रशासनाला मशीद व्यवस्थापनाने देणे गरजेचे असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

कुठल्याही धार्मिक स्थळी कुणालाही एकत्रितपणे राहता येणार नाही. असा आदेश देऊन देखील त्याची दखल न घेतल्यामुळे संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button