Breaking-newsपिंपरी / चिंचवड

किराणा मालाचे दुकान फोडून चोरी; रावेतमधील घटना

Share On

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

किराणा मालाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सकाळी शिंदे वस्ती, रावेत येथे उघडकीस आली. सचिन शशिकांत झरकर (वय 40, रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी शुक्रवारी (दि. 10) याप्रकरणी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांचे रावेत येथील शिंदेवस्ती मध्ये नारायणी शॉपिंग मॉल नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांनी गुरुवारी (दि. 9) रात्री दहा वाजता दुकान कुलूप लावून बंद केले. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून आठ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच दुसऱ्या ठिकाणी चोरी करून सहा हजार रुपये चोरून नेले. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button