Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
21 मार्चपासून पुणे शहरातील सर्व पेट्रोलपंप दुपारनंतर बंद

पुणे – पुण्यातील सर्व पेट्रोल पंप दुपारनंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंदच्या आवाहानाला अर्धवेळ पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शनिवारी 21 मार्चपासून पुणे शहरातील सर्व पेट्रोलपंप दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार आहे.
पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या या निर्णयानुसार, सर्व पेट्रोल पंप हे सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत सुरु राहतील. तर शहराबाहेरील पेट्रोलपंप हे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 या वेळेत सुरु राहणार आहेत. पुढील दहा दिवस म्हणजे 31 मार्चपर्यंत हे सर्व पंप हे दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यास पेट्रोल पंपावर यावे असे आवाहन संघटनेने केलं आहे.





