धक्कादायक : पोलीस हेड कॉन्स्टेबलची पोलीस ठाण्यातच आत्महत्या

यवतमाळ | महाईन्यूज
युवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल राजू खंडुजी उईके (वय 55) यांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. ही आत्महत्या पहाटे पावनेपाचच्या सुमारास झाली असून यामागील नेमके कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहर पोलीस ठाण्याते हेड कॉन्स्टेबल राजू उईके हे गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांनी पोलीस ठाण्यातील डी.बी. रुममध्येच गळफास घेतला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. सर्व घटनाक्रम पोलीस तपासून पाहात आहेत. राजू हे रात्री ड्युटीवर होते. त्यांनी पहाटे 1 पर्यंत गस्त दिल्याची माहिती खात्यात नोंद आहे.
मध्यरात्री गस्त देऊन राजू हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. काही फोनही त्यांनी अटेंड केले. काही जणांशी त्यांनी बातचितही केली. पहाटे पावनेपाचच्या सुमारास त्यांनी DB रुममध्येच गळफास घेतला. त्यावेळी रुममध्ये कोणीही उपस्थित नव्हते. रात्रीची वेळ असल्याने कर्मचाराही कमीच होते. सकाळी जेव्हा काही जणांनी रुममध्ये प्रवेश केला, त्यावेळी हे पाहून त्यांना धक्का बसला.




