पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भोसरीतील गवळीमाथा येथे सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार करून एकाला दिवसाढवळ्या लुटले. याबाबत पोलीस घटनास्थळी जाऊन माहिती घेत आहेत. अद्याप पोलिसांत तक्रार झालेली नाही.
ज्ञान्या लांडगे असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञान्या लांडगे हा सराईत गुन्हेगार असून तो मागील महिन्यात झेलमधून बाहेर आला आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास तो गवळीमाथा परिसरात फिरत होता. दरम्यान, त्याने जवळील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. तसेच, एकाला धमकावून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून नेली आहे. त्याचे साथिदारही त्याठिकाणी असल्याची माहिती समजते. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत आहेत. चौकशी करण्यात येत आहे.




