Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

हरभजन सिंह ‘या’ चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज हरभजन सिंह सध्या क्रिकेटपासून दूर आहे. परंतु, लवकरच तो मोठ्या पडद्यावर आपला डेब्यू करणार आहे. हरभजन सिंह ‘फ्रेंडशिप’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत आपले पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 2020मध्ये रिलीज होणार आहे.

भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक क्रिकेटर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. दरम्यान, हरभजन सिंहच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर मेकर्सनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केलं आहे. ज्यामध्ये दोन हात दिसत असून त्यामध्ये पोलिसांच्या बेड्या दिसत आहेत.

चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पोस्टर हरभजन सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलं आहे. ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटाचं दिग्दर्शन जेपीआर आणि श्याम सूर्या यांनी केलं आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती जेपीआर आणि स्टालिन यांनी केले आहे. हा चित्रपट याच वर्षी म्हणजेच, 2020मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group