निर्भया प्रकरण- चारही दोषींची  फाशी पुन्हा टळली…

निर्भया प्रकरण- चारही दोषींची फाशी पुन्हा टळली…

निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील चारही दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. पुढील आदेशापर्यंत या चौघांना फाशी देण्यात येऊ नये, असे दिल्लीतील पतियाळा हाउस कोर्टाने स्पष्ट केलं आहे..त्यामुळे उद्या म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता या चौघांना होणारी फाशी टळली आहे.

पटियाला हाउस कोर्टाने निर्भया प्रकरणातील दोषींसाठी फाशीसाठी काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटवर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे …

निर्भया प्रकरणातील एक दोषी पवन गुप्ताची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. जेव्हा घटना घडली तेव्हा आपण अल्पवयीन होतो असा दावा पवन गुप्ताने केला होता. तो दावा सुप्रीम कोर्टाने अमान्य केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *