ग्रीनपीसच्या अहवालानुसार सोलापुर मधील हवाही प्रदूषित

ग्रीनपीसच्या अहवालानुसार सोलापुर मधील हवाही प्रदूषित

सोलापूर | महाईन्यूज

भारतात सर्वाधिक प्रदूषित असणाºया शहरांच्या यादीमध्ये सोलापूर शहराचा समावेश झाला आहे. ग्रीन पीस इंडिया या पर्यावरणसंबंधी काम करणा-या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रकाशित केलेला आहे. सोलापुरात हवेच्या दोन गुणवत्ता मापक केंद्रामधून घेतलेल्या चाचणीनुसार हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे.

ग्रीन पीसने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार देशातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे ही प्रदूषित आहेत. या प्रदूषित शहरांमध्ये २० शहरे ही महाराष्ट्रातील असून यात सोलापूर शहराचा देखील समावेश यात आहे. हवेतील अतिसूक्ष्म कणांची (पर्टीक्युलेट मॅटर १०) तपासणी करण्यात आली होती. यात सोलापूर शहराचा २०१८ मधील पीएम १० हा ७१ असा आहे. २०१७ मध्ये पीएम १० हा ६४ इतका होता. या एका वर्षामध्ये हवेमधील सूक्ष्मकणात ७ पीएम १० ने वाढ झालेली आहे. शहरासाठी ठरविण्यात आलेल्या प्रमाणानुसार जर पीएम १० हा १०० च्या वर गेल्यास हवा अधिक धोकादायक बनू शकते. प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये सोलापूरचा क्रमांक हा देशात १९८ वा तर राज्यामध्ये १७ वा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *