अक्षयचा हाऊसफुल ४ जोरात! पण ट्विंकल खन्ना पाहणार नाही, कारण…

अक्षयचा हाऊसफुल ४ जोरात! पण ट्विंकल खन्ना पाहणार नाही, कारण…

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा मल्टीस्टार चित्रपट ‘हाऊसफूल ४’ काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने १९ कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता. मात्र खिलाडी कुमारचा हिट ठरलेला हा चित्रपट पत्नी ट्विंकल खन्नाने पाहण्यास नकार दिला आहे.

‘हाऊसफूल ४’ चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरताना दिसत आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये अक्षयने ट्विंकल हा चित्रपट पाहणार नसल्याचा खुलासा केला आहे. ट्विंकल नेहमी अशा प्रकारच्या चित्रपटांपासून लांब असते. त्यामुळे तिला हा चित्रपट पाहायचा नसल्याचे तिने आधीच स्पष्ट केले आहे असे अक्षयने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *