Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी चिंचवडमधून प्रशांत शितोळे अघाडीवर, मयूर कलाटे बॅक फुटवर, तर राहूल कलाटेंची धडपड

Share On

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रशांत शितोळे यांचे नाव आघाडीवर असून वाकडचे नगरसेवक मयूर कलाटे बॅकफुटवर गेले आहेत. तर, शिवसेनेचे राहूल कलाटे यांची उमेदवारी मिळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे धडपड सुरू असल्याची माहिती पक्षांतर्गत सुत्रांनी दिली.

भाजपकडून चिंचवड विधानसभेची उमेदवारी आमदार लक्ष्मण जगताप यांना मिळाली आहे. तर, भोसरीची उमेदवारी आमदार महेश लांडगे यांना देऊन कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला सस्पेन्स बाजुला सारला आहे. पिंपरीची जागा शिवसेनेकडे असल्याने आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी मिळाली आहे. आता राष्ट्रवादीच्या उमेदवारीची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती समजते. त्यामुळे पवार साहेबांच्या अगदी जवळचे मानले जाणारे मयूर कलाटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, उमेदवारीसाठी शिवसेनेचे राहूल कलाटे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे शर्तीचे प्रयत्न करत असल्याची माहिती समजते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button