Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

भाऊ भावाला गोळ्या घालतो त्याला गृहकलह म्हणतात : जितेंद्र आव्हाड

मुंबई | महाईन्यूज | प्रतीनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. तसंच राजीनाम्यानंतर ते बराच कालावधी कोणाच्याही संपर्कात नसल्याने ते राज ठाकरेंप्रमाणेच वेगळा पक्ष काढतील किंवा काही मोठा निर्णय घेतील अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. त्यातच कौटुंबिक कलहामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा असाही अंदाज बांधण्यात आला होता.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटुंबीयांमध्ये कोणताही कलह नसल्याचं म्हटलं आहे. तसंच भाऊ भावाला गोळ्या घालतो त्यालाच कौटुंबिक कलह म्हणतात, असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला.

आव्हाड यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि त्यांचे बंधू प्रविण महाजन यांच्या प्रकरणावर भाष्य केरत भाजपावर टीका केली. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या प्रकरणावरून भाजपाला लक्ष्य केलं. “हा सर्व प्रकार गृहकलहामुळे झाल्याचं म्हटलं जात आहे. परंतु आमचा घरसंसार एकच आहे. भावाने भावाला गोळ्या घालणं याला गृहकलंह म्हणतात. बाकी गृहकलह नसतो. अजित पावर हे भावनिक व्यक्ती आहेत. ते केवळ शरद पवारांचंच ऐकतात,” असं आव्हाड यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group