Breaking-newsमनोरंजन

इंटरनेटवर मंदिरा बेदीच्या ‘त्या’ फोटोने खळबळ, चाहते झाले घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लूटत आहे. दरम्यान मंदिराचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये मंदिरा अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

मंदिराने नुकताच तिच्या इन्स्टाग्रा अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मंदिराने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तिचा हा हॉट लूक चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. दरम्यान मंदिराचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे. त्यामध्ये अभिनेत्री मौनी रॉयने देखील ‘हॉट’ अशी कमेंट केली आहे.

मंदिरा आता ४७ वर्षांची असून तिला ८ वर्षांचा मुलगा आहे. तिने चित्रपट निर्माता  राज कौशलसोबत लग्न केले. मंदिरा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमी जिममध्ये वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. यावरुन मंदिरा फिटनेसविषयी जागरुक असल्याचे दिसून येते.

सध्या मंदिरा तिचा आगमी चित्रपट ‘साहो’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपर स्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. . ‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button