Breaking-newsराष्ट्रिय

३० मिनिटं पाहत होते कपडे, खरेदी न केल्याने ग्राहकाला मारहाण

कपडे खरेदी करताना आपण अनेकदा दुकानात जाऊन वेगवेगळे कपडे पाहत असतो. यावेळी काही वेळा कपडे आवडतात तर काही वेळा काहीच खरेदी न करता आपण दुसऱ्या दुकानात जाण्याचा पर्याय निवडतो. पण एका तरुणाला एका दुकानात बराच वेळ खर्च करुनही कपडे खरेदी न करणं महागात पडलं आहे. वेळ वाया गेल्याने भडकलेल्या सेल्समनने तरुणाला चक्क मारहाण केली. सेल्समनकडून यावेळी चुकीच्या भाषेचा वापर करण्यात आल्याचाही आरोप आहे. अखेर इतर लोकांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केलं. नोएडामध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवळपास ३० मिनिटं दुकानात पाहत होते कपडे
ग्रेटर नोएडा येथील पाली गावचा रहिवासी असणारा अमित कुमार कुरिअर कंपनीत नोकरी करतो. रविवारी संध्याकाळी आपली बहिण निकिता, सरोज आणि भाच्चीला घेऊन तो कपडे खरेदीसाठी एका दुकानात गेला होता. येथे त्यांनी अनेक कपडे पाहिले. यावेळी सेल्समन त्यांना हवे ते वेगवेगळ्या प्रकारचे कपडे दाखवत होता. मात्र त्यांना काहीच पसंत पडलं नाही आणि ते जाऊ लागले. इतका वेळ घेऊनही काहीच खरेदी न केल्याने सेल्समन भडकला आणि त्यांना शिव्या देऊ लागला. अमितने विरोध केला असता सेल्समनने इतर सेल्समनसोबत मिळून त्याला मारहाण केली आणि धक्का देऊन बाहेर काढलं.

गोंधळ ऐकून शेजारील दुकानदारांनी धाव घेतली आणि प्रकरण शांत केलं. मात्र यानंतरही सेल्समनने आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून अमितचा पाठलाग केला आणि पुन्हा त्याला मारहाण केली. यावेळी त्यांनी तरुणींसोबत गैरवर्तन केल्याचाही आरोप आहे. पीडितने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button