मावळात राज्यमंत्री बाळा भेगडेंनी शेतक-यांसोबत केली भात लावणी

मावळात राज्यमंत्री बाळा भेगडेंनी शेतक-यांसोबत केली भात लावणी

पिंपरी – पुणे भाजप जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे यांचे मंत्रिमंडळात मन रमत नसल्याचं दिसू लागले आहे. त्यांनी मतदारसंघातील लोकांमध्ये रमत जावून फेरफटका मारण्यास सुरुवात केलीय, मावळमध्ये मुसळधार पावसानंतर उघडीप मिळाली. सध्या भात लावणी सुरु आहे. त्यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडेही भात लावणीसाठी थेट शेतामध्ये दाखल होत त्यांनी शेतकऱ्यांसोबत भात लावणी केली.

मावळात शेतक-याचं मुख्य पीक हे भात आहे. गेल्या चार दिवसात मोठा पाऊस झाला आणि शेतकऱ्यांची भात लावणीसाठी घाई सुरु झाली. नवनिर्वाचित राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळातील विविध गावांना भेटी दिल्या.  त्या भेटीदरम्यान शेतकरी भात लावण करीत असल्याचे त्यांनी पाहिले. त्या शेतक-यांचा उत्साह वाढवण्यासाठी भेगडेही थेट शेतात जावून भात लावणी केली. मावळमधील ओझर्डे गावच्या खाचरांमध्ये भात लावणी केली. यामुळे शेतकरीही आनंदीत झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *