चिमुकलीला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार

चिमुकलीला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार

वाकड – एका चिमुकलीला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवार (दि.५) ते शनिवार (दि.१५) या दरम्यान पवनानगर काळेवाडी येथे घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, व्यंकटेश स्वामी (रा. काळेवाडी, पवनानगर येथील मैहबुब शेख यांच्या खोलीत) याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.५) ते शनिवार (दि.१५) या दरम्यान आरोपी व्यंकटेशने फिर्यादी यांच्या ८ वर्षाच्या चिमुकलीला त्याच्या खोलीत नेले. तेथे त्या नराधमाने चिमुकलीला मोबाईल मधील अश्लील व्हिडीओ दाखवला आणि त्या नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. चिमुलीने घडलेला प्रकार घरी सांगीतल्यानंतर हे प्रकरण समोर आले. आरोपी व्यंकटेशला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *