Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्प महासभेची मंजुरी

  • आयुक्तांनी अधिकार कक्षेत अमंलबजावणीस सुरुवात

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा सन २०१९- २० या आर्थिक वर्षाचा ६ हजार १८३ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आज (शनिवारी) विशेष महासभेत सादर करुन मंजूरी देण्यात आली. या महासभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर राहूल जाधव होते.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपल्या अधिकारात अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणी सुरू केली होती. केवळ महापालिकेच्या अर्थसंकल्पास औपचारिक मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या सन २०१८-१९ चे सुधारित आणि २०१९-२० या आर्थिक वर्षाचा मूळ ४ हजार ६२० कोटी, तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ६ हजार १८३ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी १८ फेब्रुवारी २०१९ रोजी स्थायी समिती समोर सादर केले होते. या अर्थसंकल्पात स्थायी समितीने सुधारणा करत २६७ कोटी रूपयांच्या उपसुचनांचा समावेश केला. त्यानंतर स्थायी समितीने 267 कोटीच्या उपसूचना वगळण्याचा ठराव मंजुर करुन महापालिका आयुक्तांच्या मूळ अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी 15 जून रोजी विशेष महासभेकडे शिफारस केली होती.

महापालिकेच्या अर्थसंकल्पाला महासभेची आज मंजुरी दिली. तत्पुर्वीच आयुक्तांनी आपल्या अधिकारात अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीला सुरूवात केली. यामध्ये कोणताही बदल न करण्याचा धोरणात्मक निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. स्थायीच्या सदस्यांनी मांडलेल्या २६७ कोटींच्या उपसुचना रद्द करून आयुक्तांचा मुळ अर्थसंकल्प अंतिम मंजुरी महासभेने दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button