Breaking-newsपुणे

पुण्यात पत्ता न सांगितल्याने तरुणावर गोळीबार

पुणे:- पुण्यात एका क्षुल्लक कारणावरुन तरुणावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पत्ता माहिती असूनही तो न सांगिल्याच्या रागात तरुणावर हा गोळीबार करण्यात आला. सनी चौधरी असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. आरोपी कारमधून आले होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दोघे फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कारमधून प्रवास करत होते. तिघेही अहमदनगरचे असून हॉटेल प्यासाला जात होते. रस्त्यात त्यांनी सनी चौधरीला पत्ता विचारला. मात्र सुरुवातीला त्याने आपल्याला पत्ता माहिती नसल्याचं सांगितलं. पण जेव्हा त्यांनी तुला कुठे सोडायचं असेल तर सोडतो असं सांगितलं तेव्हा मात्र त्याने हॉटेलचा पत्ता माहिती असल्याची माहिती दिली.

यामुळे कारमधील तिघे आरोपी चिडले आणि तुला पत्ता माहिती असूनही आधी का सांगितला नाही याचा जाब विचारला. गाडीत बसल्यानंतर आरोपींनी सनीला दमदाटी केली आणि त्याच्या पायावर गोळीबार केला. हल्ल्यात सनी चौधरी गंभीर जखमी झाला असून ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनेनंतर आरोपी फरार झाले होते पण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने कारची माहिती मिळवत एका आरोपीला अटक केली आहे. अंबादास होंडे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून, इतर दोघे फरार आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पोलीस याप्रकरणी अजून तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button