Breaking-newsराष्ट्रिय

नववीच्या विद्यार्थ्याने शिक्षिकेला पाठवले प्रेमपत्र

नववीच्या एका विद्यार्थ्याने चक्क शिक्षिकेला प्रेमपत्र पाठवल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. या पत्रामध्ये आक्षेपार्ह भाषाचा वापर करण्यात आला आहे. पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. दैनिक जागरणने या बाबतचे वृत्त दिले आहे.

नववीतील विद्यार्थाने आपल्या मित्राच्या साह्याने प्रेमपत्र शिक्षिकेच्या टेबलवर ठेवलं. शिक्षिकाने वर्गात आल्यानंतर ते पत्र वाचले तेव्हा शिक्षिका चांगलीच हैराण झाली. शिक्षिकेला पत्र कोणी लिहले समजले नाही. पण शिक्षिकेने सगळ्या विद्यार्थ्यांचं अक्षर तपासल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे नाव समोर आले. पत्र वाचल्यानंतर शिक्षिकेने याची तक्रार मुख्यध्यापक आणि शाळेच्या मॅनेजमेंटकडे केली. त्यानंतर मुख्यध्यापकांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखत पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी जेव्हा ही माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना दिली तर ते ही हैराण झाले. पालकांनी विद्यार्थ्याला शिक्षिकेची माफी मागण्यास सांगितली. पण यानंतर मुख्यध्यापकाने विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकलं. हे प्रकरण मिटले असे वाटत असतानाच याला वेगळं वळण मिळाले आहे. शाळेतून काढल्यामुळे मुलाच्या वडिलांनी शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. दोन शिक्षकांनी त्यांच्या मुलाला कोणतंही कारण नसताना शाळेतून काढून टाकल्याचा आरोप केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group