Breaking-newsपिंपरी / चिंचवड

अटलबिहारी वाजपेयींच्या निधनाने देशात दुखवटा जाहीर ; माजी नगरसेवक विनायक गायकवाड याचा अभिष्टचिंतन कार्यक्रम रद्द

Share On

शहरातील वाढदिवसाचे फ्लेक्स स्वताः उतरविले

पिंपरी – भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न, भीष्मपितामह अटलबिहारी वाजपेयी याचे आज (गुरुवारी) निधन झाले. त्याचे निधनाने देशात सात दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यामुळे माजी नगरसेवक विनायक गायकवाड याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रम त्यांनी रद्द केला आहे. तसेच वाढदिवसानिमित्त शहरात लावलेले शुभेच्छाचे होर्डिग्ज काढण्यात येवू लागले आहेत. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा ममताताई गायकवाड यांचे पती, माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. परंतू, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे आज निधन झाले. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विनायक गायकवाड  म्हणाले की, ” माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे देशासाठीचे योगदान हे अनन्यसाधारण आहे. त्यांच्या योगदानामुळे या भारत देशाला वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करुन आजचा हा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे.”

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button