Breaking-newsराष्ट्रिय
अरूणाचलात दरडी कोसळून पाच ठार

इटानगर, अरूणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात दरडी कोसळून ठार झालेल्यांची संख्या आता पाच झाली आहे. तर अन्य आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आयटीबीपीच्या एका जवानाचाही समावेश आहे. आठ जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये आयटीबीपीच्या चार जणांचा समावेश आहे. मान्सुनच्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी हे दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. आयटीबीपीच्या 20 जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर ही दरड कोसळली. त्यात या मिनीबसचा चुराडा झाला. हा प्रकार लिकाबली पासून 5 किमी अंतरावर झाला. गेल्या पाच दिवसांत या राज्यात दरडी कोसळण्याचा हा दुसरा मोठा प्रकार आहे. पहिल्या प्रकारातही चार जण ठार झाले होते त्यामुळे गेल्या पाच दिवसांत अरूणाचलात दरडी कोसळून मरण पावलेल्यांची संख्या आता एकूण नऊ झाली आहे.





