क्रिडा

स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा : अनुराग गिरी, सिद्धांत पाटे, विशाल कदम, वीरेन शर्मा, सुमेर मागो तिसऱ्या फेरीत

  • पहिली डेक्‍कन जिमखाना अखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा 

पुणे – अनुराग गिरी, सिद्धांत पाटे, विशाल कदम, वीरेन शर्मा, सुमेर मागो आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना पहिल्या डेक्‍कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. डेक्‍कन जिमखाना क्‍लबतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. डेक्‍कन जिमखाना येथील स्नूकर हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत औरंगाबादच्या अनुराग गिरी याने पूना क्‍लबच्या दिनेश मेहतानी याचा 48-51, 72(63)-16, 60-04, 59-34 असा पराभव केला. आपल्या विजयात अनुरागने 63 गुणांचा ब्रेकही नोंदविला. रॉयल्सच्या सिद्धांत पाटे याने पीवायसीच्या निमिष कुलकर्णी याचा 14-66, 49-73, 62-40, 53-41, 73-40 असा पराभव करून स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदविला.

आणखी एका लढतीत पीवायसीच्या विशाल कदमने क्‍यू क्‍लबच्या विशाल रजानी याचा 48-06, 40-55, 61-02, 09-45, 56-10 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. तर क्‍यू क्‍लबच्या वीरेन शर्मा याने अमरदीप घोडके याचा 33-69 (50), 60-36, 43-71, 69 (51)-04, 74-09 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. वीरेनने आपल्या खेळीत 50 आणि 51 गुणांचे ब्रेकही नोंदविले. तसेच मुंबईच्या सुमेर मागो याने डेक्‍कनच्या सुशील ढोंसळे याचा 38-66, 52-43, 70-14, 50-59, 72-32 असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा निकाल- 
दुसरी फेरी – क्रिश गुरबक्षानी (खार जिमखाना) वि.वि. अलेक्‍स्‌ रेगो (क्‍यू क्‍लब) 66-14, 45-68, 64-43, 72-22, विवेक उबरचंद (रॉयल क्‍लब) वि.वि. संदीप जाजू (डेक्‍कन) 69-20, 51-37, 58-28, गौरव कासार (सातारा) वि.वि. आमिर खान (क्‍यू क्‍लब) 64-53, 48-32, 61-32, ऋषभ ठक्‍कर (खार जिमखाना) वि.वि. अरूण बर्वे (पीवायसी) 55-37, 42-59, 65-35, 65-39, रोहन साकळकर (मुंबई) वि.वि. कुमार शिंदे (पूना क्‍लब) 57-11, 17-71, 58-34, 56-53, योगेश कुमार (कर्नाटक) वि.वि. श्रीनिवास कस्तुरी (क्‍यू क्‍लब) 68-35, 51(47)-40, 57-14, अनुराग गिरी (औरंगाबाद) वि.वि. दिनेश मेहतानी (पूना क्‍लब) 48-51, 72(63)-16, 60-04, 59-34, अमोल अब्दागिरी (डेक्‍कन) वि.वि. सतीश कराड (डेक्‍कन) 38-50, 56-11, 50-21, 63-32, सिद्धांत पाटे (रॉयल्स्‌) वि.वि. निमिष कुलकर्णी (पीवायसी) 14-66, 49-73, 62-40, 53-41, 73-40, विशाल कदम (पीवायसी) वि.वि. विशाल रजानी (क्‍यू क्‍लब) 48-06, 40-55, 61-02, 09-45, 56-10, सुनील जैन (मुंबई) वि.वि. देवदत्ता महाजन (अकोला) 80(52)-14, 79-50, 99-10, वीरेन शर्मा (क्‍यू क्‍लब) वि.वि. अमरदीप घोडके (क्‍यू क्‍लब) 33-69(50), 60-36, 43-71, 69(51)-04, 74-09, सुमेर मागो (मुंबई) वि.वि. सुशिल ढोंसळे (डेक्‍कन) 38-66, 52-43, 70-14, 50-59, 72-32, सिद्धार्थ टेंबे (डेक्‍कन) वि.वि. कृणाल कदम (पुणे) 56-40, 34-50, 62-20, 61-22.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button