Breaking-newsपुणे

पेट्रोलचे पेटते गोळे टाकून घर पेटवण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद

 जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गुन्हेगारांनी काल पहाटे एका घरावर पेट्रोलचे पेटते बोळे टाकून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर पार्क केलेल्या 4 दुचाकी सीसीटीव्हीची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवली. ही घटना कोथरूडमधील शास्त्रीनगर येथील पीएमसी कॉलनीत घडली.

कोथरूड पोलिसांनी दादा कुंडले व त्याचा साथीदार साळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुंडले याचे चुलते व या ठिकाणी राहणाऱ्या महिलेचे पूर्वी भांडण झाले होते. त्यामुळे हे दोघे या पीएमसी कॉलनीत येऊन गाड्याची तोडफोड केली व सीसीटीव्हीही फोडले. मात्र, तरी त्यांचे कृत्य त्या परिसरातील एका सीसीटीव्हीत कैद झाले आहे. कोथरूड पोलीस या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group