Breaking-newsमुंबई

शॉर्टकट ‘त्या’ चार तरुणांच्या जिवावर बेतला

मुंबई : शॉर्टकटने रूळ ओलांडण्याचा प्रयत्न चार तरुणांच्या जिवावर बेतला. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली-बोरिवली स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. कोकणातून मुंबईत जन्मशताब्दी एक्स्प्रेसने परतणाऱ्या चार तरुणांना सकाळी ५.३०च्या सुमारास रूळ ओलांडताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू ओढवला. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ असून अन्य दोघे चुलत भाऊ आहेत. या चौघांच्या मृत्यूने संपूर्ण चव्हाण कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.

कांदिवलीतील पोईसरमधील जीवन कोया चाळीत राहणारा सागर चव्हाण (२३) हा काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील फोंडाघाटातील नवीन कुर्ली वसाहत या आपल्या गावी गेला होता. परत मुंबईत येताना त्याच्या सोबत साईप्रसाद (१७), दत्तप्रसाद (२०) आणि मनोज (१७) हे तीन चुलत भाऊ होते. त्यातील साईप्रसाद आणि दत्तप्रसाद हे सख्खे भाऊ आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group