क्रिडाताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

राष्ट्रीय मर्दानी स्पर्धेत शहरातील 20 विद्यार्थिनींनी घेतला सहभाग

संपूर्ण महाराष्ट्रातून शंभर स्पर्धक सहभागी

पिंपरी : आरपुरा गोवा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय मर्दानी स्पोर्टस स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. भारतीय मर्दानी स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुमार सिंग व सेक्रेटरी संतोष खंदारे आणि खजिनदार विनोद कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शहरातील 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून शंभर स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, पंजाब, तामिळनाडू, केरळ, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यातील सुमारे 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक महाराष्ट्राने पटकाविला व द्वितीय तामिळनाडू तर तृतीय केरळ या राज्याने पटकाविला. यामध्ये पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थ्यांना 10 सुवर्णपदक, 4 रौप्यपदक आणि 9 कांस्यपदक प्राप्त झाले. मर्दानी स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष रवी गायकवाड यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षिका स्नेहल पवार यांनी व आर्या मार्शल आर्टस संस्थेचे सेक्रेटरी विकास जगताप यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यश सुरवसे, चैतन्य कलकत्ते, नेहा जवंजाळ, आकांक्षा उजगरे, शरीफ शेख, ऋतिका वाघमारे, धनश्री लेंगरे, निहिरा कुलकर्णी यांनी सुवर्णपदक मिळविले. हर्षल देसले स्वरात कुदळे राज जाधव शोएब अन्सारी पृथ्वीराज सोनवणे यांनी रौप्यपदक मिळविले. तर रुद्र धनवे, झीनत अन्सारी, निकिता भिरूड, प्रतीक्षा सूर्यवंशी, किरण घोलप, प्रणिता कालवे, अंश जाधव यांना कास्यपदक मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button