breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तळवडे दुर्घटनेतील आणखी २ महिलांचे उपचारा दरम्यान निधन

पिंपरी: तळवडे येथील स्पार्क:ल कँडल कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेतील जखमी रुग्ण प्रियंका यादव यांचे रात्री १:४५ वाजता  तर अपेक्षा तोरणे यांचे सकाळी ६.३०  वाजता  ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आज निधन झाले आहे .मृतांबद्दल शोक व्यक्त करत आयुक्त शेखर सिंह यांनी कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत आशा भावना व्यक्त केल्या आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण केली

पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे एका स्पार्कल कँडल कारखान्याला लागले आगीमुळे हि दुर्घटना ८ डिसेंबर रोजी झाली. हया दुर्घटनेत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता आणि  १० जण जखमी झाले होते. पुढील उपचारांसाठी जखमींना पुणे येथील ससून रुग्णालयात तातडीने  दाखल करण्यात आले होते. त्या जखमी रुग्णामधील प्रतिक्षा तोरणे आणि कविता राठोड यांचे दि.९ डिसेंबर रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले तर शिल्पा राठोड यांचें दि.१० डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. आणि उर्वरीत जखमींपैकी आज २ जणांचे उपचारादरम्यान  ससून रुग्णालयात निधन झाले आहे. तरी या घटनेतील मृतांची संख्या ११ झाली आहे

हेही वाचा – खासदार सुप्रिया सुळेंना दुसऱ्यांदा ‘संसद महारत्न पुरस्कार’

ससून रुगणालयात दाखल असणाऱ्या उषा पाडवी, सुमन गोंधळे, कोमल चौरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार या जखमी रुगणावर उपचार सुरू आहेत.आयुक्त शेखर सिंह यांचें  या रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत आणि वेळोवेळी या रुग्णांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेत आहेत.

ससून रुगणालयात दुर्घटनेतील जखमी रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने २४x७ मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि २ मदतनीस यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button