breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

1947 पासूनच्या काळात हे पहिल्यांदाच घडणार, 2021चा यंदाचा अर्थसंकल्प छापला जाणार नाही!

केंद्रीय अर्थमंत्रालयातर्फे प्रसिद्ध करण्यात येणारा अर्थसंकल्पाबाबत मोठी बातमी आहे. 2021 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प छापला जाणार नाही, अशी माहिती मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. 1947 पासूनच्या काळात हे पहिल्यांदाच घडणार आहे.

कोरोना व्हायरस, कोविड 19 च्या महामारीमुळं यंदा (Budget 2021) अर्थसंकल्पीय कागदपत्र छापली जाणार नाहीत. केंद्रीय अर्थमंत्रालयानुसार कोरोनाच्या संकटामुळं अर्थसंकल्प छापण्यासाठी दिवसरात्र छपाई कामासाठी छपाई कारखान्यात एकाच वेळी 100 जणांना कामासाठी एकाच ठिकाणी ठेवण्यात येणार नसल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थसंकल्पाच्या सॉफ्ट कॉपी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 1 फेब्रुवारी 2021ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारीदरम्यान पार पडणार आहे. तर, दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संससदेच्या दोन्ही सदनांना एकत्रित संबोधित केल्यानंतर 29 जानेवारीला लोकसभेत आर्थिक विश्लेषण अहवाल सादर केला जाईल. ज्यामध्ये मागील वर्षभरात आर्थिक क्षेत्रातील देशाची प्रगती आणि अर्थसंकल्पातील संभाव्य माहिती संक्षिप्त स्वरुपात मांडलेली असेल. अर्थमंत्रालयाकडून हा अहवाल सादर करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button