breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

रोहित पवार यांचा अजित पवार गटातील आमदारांना अल्टीमेटम; म्हणाले..

मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादीत उभूी फूट पडली आहे. मात्र अजित पवार यांच्यासोबतचे आमदार बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो लावला जात आहे. यावरून शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील नेत्यांना अल्टीमेटम दिला आहे.

रोहित पवार म्हणाले, अजित पवार गटाकडून फोटो वापरण्याबाबत शरद पवारांनी वक्तव्य केलं आहे. ज्या ठिकाणी अजित पवार गटाच्या मोठ्या सभा होतात, तिथून त्यांनी शरद पवारांचा फोटो वापरणं बंद केलं आहे. पण आमदारांना माहीत आहे, शरद पवारांशिवाय लोक आपल्याला मतदान करणार नाहीत. त्यामुळे त्या-त्या आमदारांकडून स्थानिक स्तरावर फोटो लावला असावा. ज्यांना पदं मिळाली, ज्यांना मंत्रिपदं मिळाली, जे आज सत्तेत आहेत, ते कदाचित शरद पवारांना विसरले असतील. पण अनेक आमदार अजून शरद पवारांना विसरले नाहीत. अजूनही वेळ गेली नाही.

हेही वाचा – ‘..तसं इंडियाचं नाव भारत होऊ शकतं’; इंडिया-भारत वादावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया 

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एकच अध्यक्ष आहेत, ते म्हणजे शरद पवार. आता अजित पवार गटाला निवडणूक आयोगाबाबत आत्मविश्वास आहे, त्यांना वाटतं की निवडणूक आयोग त्यांच्या खिशात आहे, ते बरोबरच आहे. निवडणूक आयोग त्यांच्या बाजुने निर्णयही देईल. पण सर्वोच्च न्यायालय अजूनही न्यायाच्या बाजुने म्हणजेच आमच्या बाजुने आहे, असं रोहित पवार म्हणाले.

आमचा लढा मोठा आहे. आमच्याकडे पक्ष आणि चिन्ह असलं काय आणि नसलं काय… आमच्याकडे पवारसाहेब आहेत. शरद पवारांच्या हिंमतीवर, लोकांच्या ताकदीवर आणि लोकांना विश्वासात घेऊन आम्ही आमचा लढा लढू. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यांचा अहंकार आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही, असंही रोहित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button