breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

11 हजार मराठा तरुणांना 550 कोटी रुपयांचे कर्जवाटप : नरेंद्र पाटील

जालना | “राज्यातील एक लाख मराठा तरुणांना उद्योग, रोजगार तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 11 हजार मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून साडेपाचशे कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असल्याची माहिती”, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला नागपुरात बोलावून अधिवेशनादरम्यान महामंडळाचा आढावा घेतल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. महामंडळ अजून गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा जवाबदारी सांभाळण्यास सांगितले असल्याचेही पाटील यांनी म्हटले. राज्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अमराठी बँक व्यवस्थापक असल्याने, कर्जमंजुरी होण्यास अडचणी येत असल्याचा दावा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button