breaking-newsपुणे

हेल्मेट कारवाईसाठी सीसीटीव्हीचा वापर

  • अपुऱ्या मनुष्यबळाची वाहतूक पोलिसांकडे सबब नाही

पुणे शहरात नववर्षांपासून (१ जानेवारी २०१९) हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नुकतेच जाहीर केले. वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ विचारात घेता हेल्मेट सक्ती झाल्यानंतर प्रत्येक चौक तसेच गल्लीबोळात कारवाई करणे शक्य होणार नाही. त्यामुळे हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांवर शहरातील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे शहरात रस्ते अपघातात मोठय़ा संख्येने दुचाकीस्वार बळी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाढते अपघात तसेच त्यात मृत्युमुखी पडणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण विचारात घेऊन १ जानेवारी २०१९ पासून शहरात हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेल्मेट परिधान केल्यास डोक्याला होणारी गंभीर स्वरूपाची दुखापत टाळता येईल, तसेच दुचाकीस्वाराचा जीवदेखील वाचेल, असे मत पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी व्यक्त केले आहे.

पुणे शहराचा वाढता विस्तार पाहता हेल्मेट सक्ती झाल्यानंतर शहरातील प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस नेमणे शक्य होणार नाही. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे सध्या एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने पुणे आणि पिंपरी शहर परिसरातील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर १२४० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सध्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट सक्ती झाल्यानंतर हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रभावी कारवाई करणे शक्य होईल, अशी माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button