breaking-newsराष्ट्रिय

हिंदू दहशतवादी होऊ शकत नाही – नरेंद्र मोदी

वर्धा – हिंदू आतंकवाद शब्द ऐकून तुम्हाला दु:ख झालं नाही का ?, हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. काँग्रेसने हिंदुंना अपमानित करण्याच पापं केलं आहे, अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान होत असून प्रत्येक टप्प्यात दोन अशा रीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात आठ प्रचारसभा होण्याची शक्यता आहे.

मोदी म्हणाले की, हिंदू आतंकवाद शब्द ऐकून तुम्हाला दु:ख झालं नाही का ?, हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. काँग्रेसने हिंदुंना अपमानित करण्याच पापं केलं आहे. सुशीलकुमार शिंदेंनी हिंदू दहशतवादाचा उल्लेख केला. हिंदू दहशतवादाच्या पापातुन काँग्रेसला कधीही मुक्ती मिळणार नाही. शरद पवार देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार विचाराशिवाय कुठलीही कृती करत नाहीत असे बोलले जाते. शरद पवारांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. पण, त्यांनी निवडणूक न लढवण्याच निर्णय घेतला आहे.

भाजपा सरकार सर्व योजना वेळेत पूर्ण करेल.  मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार योजनेच कौतुक आहे. विदर्भातील दुष्काळ आघाडी सरकारमुळे वाढला आहे. महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या विचारांचे काँग्रेस नेत्यांनी किती अनुसरण केले हे आपल्या सर्वांना माहित आहे. मला आशीर्वाद देण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे. एमीसॅट आणि २७ नॅनो उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांच अभिनंदन केलं. वर्ध्यातून महाराष्ट्रातील निवडणूक अभिनयाची सुरुवात करता आली हे माझं भाग्य आहे, असेही मोदी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यावेळी सुद्धा विदर्भात भाजपा-शिवसेनेला दहापैकी दहा जागा जिंकेल. आज विदर्भावर अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सिंचन, रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला. पंधरावर्षात दिलं नाही, ते चार वर्षाला विदर्भाला देण्याचा प्रयत्न केला. पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला. आमच्या सरकारमध्ये कर्जमाफीत वर्ध्याला ४२८ कोटी मिळाले. विरोधकांनी ५६ पक्षांची मोट बांधली आहे. पण देश चालवण्यासाठी ५६ पक्ष नाही ५६ इंचाची छाती लागते. देशाकडे वाकडया नजरेने बघणाऱ्याचं काय होते, ते बालकोटमध्ये पाहिले, असे बोलून फडणवीस यांनी शहीद जवानांच्या शौर्याचंही श्रेय लाटलं.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button