breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दिल्लीतील चार मॉडेल ताब्यात

पिंपरी – हिंजवडी-मुळशी परिसरात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कोलते पाटील इस्टेटमधील एका फ्लॅटवर छापा टाकून देहविक्री करणाऱ्या दिल्लीतील चार मॉडेल्सना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, मुळशीतील कोलते पाटील इस्टेटमधील लाईफ रिपब्लिक सोसायटीत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हिंजवडी पोलिस स्टेशनच्या उपपोलिस निरीक्षक कविता नागेश रुपनर यांनी सांगितले की, लाईफ रिपब्लिक सोसायटीत दिल्लीतील चार मॉडेल्सना बोलावून त्यांच्याकडून देहविक्री करवून घेण्यात येत असल्याची गोपनिय माहितीच्या आधारावर ही करवाई करण्यात आली. आरोपी आर्यन उर्फ विश्वास बळीराम सावरगावकर ( वय-34, रा. ए. 108, आर.3 बिल्डिंग, कोलते पाटील इस्टेटमधील लाईफ रिपब्लिक सोसायटी), नितीन शरद भालेराव (वय- 25, रा. प्रकाश नगर, पाण्याच्या टाकीजवळ, सराफ लाईन, लातुर), अभय सज्जनराव शिंदे (वय- 25, रा. शिवाजी चौक, शिवकृपा निवास, लातुर) मयुर गणेश शर्मा (वय-भावनी चौक, आनंद नगर, भोपाळ, मध्य प्रदेश), दिलीप भागिरथ मंडल (वय-24, ए-104, करण अपार्टमेंट, नालासोपारा ईस्ट, वसई पालघर) अशी आरोपींची नावे आहेत.

सर्व आरोपी दलाल आहेत. त्यांनी दिल्लीतील चार मॉडेल्यना पैशाचे आमिष दाखवून देहविक्री करण्यासाठी बोलावले होते. त्यांना ग्राहक मिळवून देऊन त्यांना देहविक्रीसाठी प्रवृत्त करत होते. सर्व आरोपींविरूद्ध पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button