breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…तर राज्यातील एकही विद्युत कार्यालय सुरक्षित राहणार नाही – सचिन चिखले

पिंपरी / महाईन्यूज

वाढीव वीज बिलाच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आज जोरदार आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनकर्त्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकाव केला. हा मोर्चा शनिवार वाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.

पोलिसांनी मनसेच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही संवैधानिक पध्दतीने आंदोलन करण्याचा मार्ग मनसैनिकांनी निवडला होता. आंदोलन करताना याचा धसका घेऊन पोलिसांनी पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चिखले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

त्यावेळी मनसैनिकांनी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. हे आंदोलन आणखी चिघळू नये, यासाठी पोलिसांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सुटका केली.

राज्याच्या विद्युत विभागाकडून सर्वसामान्यांचा गळा घोटण्याचा उद्योग केला जात आहे. अव्वाच्या सव्वा वाढीव बिले देऊन नागरिकांची लुट केली जात आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला असता पोलिसांना पाठवून गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापुढे असा प्रयत्न केला तर राज्यातील एकही विद्युत कार्यालय सुरक्षित राहणार नाही, असा इशारा मनसेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते तथा शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी यावेळी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button