breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

स्वस्त घरे, हॉकर्स झोनसाठी कष्टकरी आक्रमक, प्राधिकरण प्रशासनाच्या विरोधात आंदोलन

  • गोरगरिबांच्या घरासाठी बिल्डर लॉबीचा प्रकल्पाला विरोध
  • कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांचा आरोप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून गेल्या वीस वर्षांमध्ये एकही ग्रह प्रकल्प झाला नाही. प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक ३० आणि ३२ येथे होत असलेल्या ग्रह प्रकल्पाची सुमारे चार वर्षापासून कामास सुरुवात झालेली आहे. केवळ काम दिखाऊपणा आणि चालढकल केली जात असून श्रमिक कष्टकऱ्यांसाठी होणाऱ्या घरासाठी शहरातील अनेक मंडळी सह बिल्डर लॉबीचा विरोध आहे, अशा प्रकल्पातून घरे झाल्यास त्यांची घरे विकली जाणार नाहीत, म्हणून काही लोक जाणून-बुजून त्यांच्या घरांसाठी विरोध करीत आहेत, असे मत कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

यावेळी उपाध्यक्ष राजेश माने, दादा खताळ, सुरेश देडे, मनीषा राऊत, महिला विभागाच्या माधुरी जलमुलवार, वंदना थोरात, अर्चना कांबळे, सुमन अहिरे, राजेश बोराडे, इरफान चौधरी, अमृत माने, उमेश ड़ोर्ले, वृषाली पाटणे, अनिल बारवकर, छाया येडगे, उषा भिसे आदी उपस्थित होते. कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे ऑगस्ट क्रांती सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आकुर्डी कार्यालयासमोर आंदोलनात करण्यात आले. आपल्या मागण्यांचे फलक हातात घेऊन तसेच मागण्यासाठी घोषणा देत भर पावसामध्ये शहरातील कष्टकरी, श्रमिकांनी सहभाग नोंदवला.

यावेळी नखाते म्हणाले की, “सन १९९८ ते २०१७ या कालावधीमध्ये प्राधिकरणाकडून सुमारे वीस वर्षांमध्ये एकही प्रकल्प झाला नाही. सर्वसामान्य नागरिकांना यामुळे हक्काच्या घरांपासून वंचित राहावे लागत आहे. प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पामध्ये दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये केवळ अर्थसंकल्पामध्ये मोठ्या आर्थिक तरतुदीच्या घोषणा केल्या जातात. मात्र, घरांची योजना प्रत्यक्षात येत नाही. पेठ क्रमांक १२ येथे होत असलेल्या ४ हजार ८८३ सदनिका निर्माण करण्यात येत आहेत. मात्र, येथील काम सुद्धा धीम्या गतीने सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी बांधलेल्या घारांना अधिकृत करण्याची केवळ घोषणा करण्यात आली. अजुनही घरे अधिकृत करण्यात आले नाहीत.

त्यामुळे अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी प्राधिकरणाने प्रयत्न करावेत. प्राधिकरणाकडून गरिबांना परवडणारे सुमारे १५  हजार घरांची निर्मिती करावी. सध्या सुरू असलेले गृह प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावेत, आणि  प्राधिकरण क्षेत्रातील पथ विक्रेत्यांसाठी हॉकर्स झोनची निर्मिती करावी, आदी मागण्यांसाठी आंदोलन करून प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी व कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी घरांच्या बाबतीत असलेल्या त्रुटी दूर करून बांधकाम जलद करण्यासाठी आदेश देऊ आणि हॉकर्स झोनबाबत ही सकारात्मक विचार करू, असे आश्‍वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button