breaking-newsमहाराष्ट्र

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांचा राजीनामा

वर्धा : सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही आणि सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांच्यात झालेल्या वादामुळे अखेर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा प्रभू यांनी दिला. टी आर एन प्रभू यांच्या राजीनाम्यामुळे गांधीवाद्यांमध्ये खळबळ माजली असून प्रभू यांनी न्यायालयात जाण्याचा देखील इशारा दिला आहे. या राजीनामा नाट्याचे गूढ 2018 मध्ये सेवाग्राम येथे झालेल्या काँग्रेसच्या वर्कींग कमिटीच्या बैठकीला जागा न दिल्याच असल्याचे समोर आले आहे. एवढंच नव्हे तर प्रभू यांनी सर्व सेवा अध्यक्षांकडून चुकीचे आरोप आणि सुरु असलेला दुष्पचार यामुळे राजीनामा देत असल्याच नमूद केलं आहे.

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त संपूर्ण जगात शांततेचा संदेश देणाऱ्या गांधीवाद्यांमध्येच सध्या वातावरण अशांत असल्याचं दिसून येत आहे. सर्वत्र कार्यक्रमांची रेलचेल वर्षभर पाहायला मिळाली. तर दुसरीकडे, सेवाग्राम आश्रम परिसरात सेवाग्राम विकास आराखड्यात विकास कामाचा धडाकाच लावण्यात आला होता.

सिमेंट काँक्रीटचे काम आश्रम परिसरात होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. पण अलीकडच्या काळात परिसरात सिमेंटकरन वाढले होते. त्यामुळे आश्रम प्रतिष्ठान आणि सर्व सेवा संघ यांच्यात खटके उडायला लागले होते. पण, 2018 मध्ये ठरलेल्या काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीला सेवग्राम आश्रमाच्या शांती निवासाची जागाच नाकारण्यात आली होती. तेव्हापासून सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही आणि सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांच्यात वाद वाढू लागले. अखेर मार्च महिन्याच्या अखेरीस विद्रोही यांचा कार्यकाळ संपण्याच्या आधी 18 मार्च ला प्रभू यांना पत्र देऊन पदावरून पायउतार होण्याचे फर्मान सोडण्यात आले होते.

टी आर एन प्रभू हे मूळचे केरळचे आहेत. तर विद्रोही अहमदाबादचे आहेत. प्रभूंनी बऱ्याचदा काँग्रेस तसेच राष्ट्रीय सेवा दलाला आश्रम परिसरात कार्यक्रम करण्यास मज्जाव घातला असल्याचा आरोप महादेव विद्रोही यांनी केला आहे. तर वेळोवेळी आपल्या कामात हस्तक्षेप करुन आपल्याला अपमानित केले गेले, असा आरोप टी आर एन प्रभू यांनी केला आहे. तर आपण कुठल्याही राजकीय पक्षाशी जवळीक साधून नाही, असे म्हणत प्रभू यांनी काँग्रेसवर सडकून टीका देखील केली आहे . 1947 नंतरच काँग्रेस संपली असल्याचा खळबळजनक खुलासा प्रभुनी केल्यामुळे या राजीनामा नाट्यामागे काही राजकारण तर दडलेले नाही ना असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button