breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुजय विखे पाटलांना भाजपची उमेदवारी, तर दोन आमदारांचा पत्ता केला कट

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील असणार आहेत. लातूर मतदारसंघातून सुधाकरराव शृंगारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे अहमदनगरमधून खासदार दिलीप गांधी आणि लातूरमधून खासदार डॉ. सुनिल गायकवाड यांचा पत्ता कापण्यात आला आहे.

नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या सुजय विखेंना भाजपाने तिकीट दिले आहे. लातूरमधील भाजपा गटाचे नेेते आणि ठेकेदार सुधाकरराव शृंगारे यांच्या उमेदवारीमुळे लातूर मतदारसंघात राजकीय भूकंप झाला, असून सुनिल गायकवाड गटातून नाराजी व्यक्त होत आहे.

सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील असणार आहेत. तर, लातूर मतदारसंघातून सुधाकरराव शृंगारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगरमधून खासदार दिलीप गांधी आणि लातूरमधून खासदार डॉ. सुनिल गायकवाड यांचा पत्ता कापण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे. नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या सुजय विखेंना भाजपाने तिकीट दिले आहे. लातूरमधील भाजपा गटाचे नेेते आणि ठेकेदार सुधाकरराव शृंगारे यांच्या उमेदवारीमुळे लातूर मतदारसंघात राजकीय भूकंप झाला असून सुनिल गायकवाड गटातून नाराजी व्यक्त होत आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी दोन वर्षापासून तयारी करत होत. दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे गेली. काँग्रेसला जागा सोडण्यास शरद पवार तयार नव्हते. त्यामुळे उमेदवारीसाठी त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले होते. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता करण्यात आला आहे. गांधी यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे भाजपने सुजय यांच्या रुपाने नवा चेहरा अहमदनगरला दिला आहे. दिलीप गांधी यांनी पहिल्यांदा 1999 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटीवर लढणारे माजी खासदार दादापाटील शेळके यांना २ लाख ५० हजार ५१ एवढी मते मिळाली. तर काँग्रेसच्या तिकिटावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस रिंगणात होते. त्यांना १ लाख ८८ हजार २५१ मते पडली. तर यावेळी खासदार दिलीप गांधी यांना २ लाख ७८ हजार मते मिळाली होती.

भाजपाच्या 16 लोकसभा उमेदवारांची नावे  

महाराष्ट्रातील जागा वाटप 

नागपूर – नितीन गडकरी, नंदुरबार – हिना गावित, धुळे – सुभाष भामरे, रावेर – रक्षा खडसे, अकोला – संजय धोत्रे, वर्धा – रामदास तडस, चिमूर-गडचिरोली – अशोक नेते, जालना – रावसाहेब दानवे, भिवंडी – कपिल पाटील, मुंबई नॉर्थ – गोपाळ शेट्टी, मुंबई नॉर्थ सेंट्रल – पूनम महाजन, नगर – सुजय विखे, बीड – डॉ. प्रीतम मुंडे, लातूर – सुधाकरराव श्रृंगारे, सांगली – संजयकाका पाटील, चंद्रपूर – हंसराज अहिर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button