breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीलेख

सुंदर आणि डागविरहीत त्वचेसाठी झोपण्याआधी कोरफड लावा आणि आश्चर्यकारक फरक पहा…

सुंदर आणि डागविरहित चेहरा सर्वांचच स्वप्न असंत त्यासाठी मुलगा असो वा मुलगी सर्वजन कितीही महागड्या पार्लर ट्रीटमेंट करायला तयार असतात. पण पार्लर ट्रीटमेंटमुळे दीर्घ काळ फायदे मिळत नाहीत. त्यापेक्षा नैसर्गिकरित्या मिळालेलं सौंदर्य हे दिर्घकाळ टिकणार असतं तेही कोणत्याही साईडईफेक्ट शिवाय…त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सर्वांच्या घरी सहज उपलब्घ असणारी कोरफड…कोरफडमध्ये अँटी सेप्टिक, अँटी बॅक्टेरिअल, अँटी इन्फ्लेमेटरी यासारखे कित्येक गुणधर्म असतात.

शिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए आणि फॉलिक अ‍ॅसिड सारखेही पोषण तत्त्व आहेत. हे आपल्या त्वचेसाठी टॉनिक प्रमाणे कार्य करते. कोरफडीचे कित्येक आरोग्यवर्धक फायदे देखील आहेत. कोरफडीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या कमी होतात. यामुळे आपले शरीर डिटॉक्स देखील होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले गेल्यास याचे त्वचेवर सकारात्मक परिणाम होतात.

​त्वचेसाठी कोरफड कशई असते खास…

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो यावा यासाठी क्रीम, साबण, फेस वॉश आणि अँटी एजिंग नाइट क्रीम यासारखे ब्युटी प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहेत. पण हे केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट वापरण्यापूर्वी नीट विचार करा. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्याला फायदा नाही तर त्वचेचं नुकसान होत आहे. याऐवजी तुम्ही घरगुती किंवा नैसर्गिक औषधोपचारांची मदत घेण कधीही उत्तम. त्वचेसाठी कोरफड वापरणे हा उत्तम उपाय आहे.

​डागांची समस्या होते दूर

कोरफडीच्या वापरामुळे चेहऱ्यावर डाग, मुरुम कमी होण्यास मदत मिळते. वृद्धत्वाची लक्षणे आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा, यातील पोषक घटकांमुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. चेहरा उजळ आणि प्रसन्न दिसतो.

​त्वचेसाठी कोरफडीचे काय फायदे आहेत

मुरुम आणि सुरकुत्यांच्या समस्येवर कोरफड जेल रामबाण उपाय आहे. यातील अमिनो अ‍ॅसिड त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्याचे कार्य करते. शिवाय त्वचेला नैसर्गिक स्वरुपातील अँटी एजिंग आणि मॉइश्चराइझर मिळते, ज्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. त्वचा कोरडी होत नाही. नाइट क्रीम म्हणून कोरफडीचा वापर केल्यास त्वचेशी संबंधित सर्व समस्या कमी होण्यास मदत होते.

घरगुती अ‍ॅलोव्हेरा क्रीम

केमिकलयुक्त क्रीम वापरण्याऐवजी घरामध्येच नॅचरल अ‍ॅलोव्हेरा क्रीम तयार करून आपण वापरू शकतो… या क्रीममुळे तुमची त्वचा खोलवर मॉइश्चराइझ होण्यास मदत होते.

तर पाहुया अ‍ॅलोव्हेरा क्रीम कशी तयार करायची

दोन चमचे कोरफड जेल, एक चमचा लव्हेंडर ऑइल आणि गुलाब पाणी

क्रीम तयार करण्याची पद्धत

एका वाटीमध्ये कोरफडीचा ताजा गर आणि लव्हेंडर ऑइल एकत्र घ्या. यानंतर त्यामध्ये गुलाब पाणी देखील मिक्स करा. ही सर्व सामग्री मिक्सरमध्ये वाटून तुम्ही त्याची क्रीम तयार करू शकता. आता एका कंटेनरमध्ये ही क्रीम भरून ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा आणि रात्री झोपण्यापूर्वी क्रीम चेहऱ्यावर लावा.

​अ‍ॅलोव्हेरा नाइट क्रीमचे फायदे

या क्रीममुळे तुमच्या चेहऱ्यावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. पण जर तुम्हाला यातील एखाद्या सामग्रीपासून अ‍ॅलर्जी असेल तर हा उपाय करू नका. या क्रीममुळे त्वचा अजिबात चिकट होत नाही. त्वचेचा तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळते. वाढत्या वयोमानानुसार चेहऱ्यामध्ये होणारे बदल, सुरकुत्यांचा त्रास कमी होतो. कोरफडमध्ये अँटी -बॅक्टेरिअल गुणधर्म असल्यानं आपली त्वचा स्वच्छ आणि मऊ होते. त्वचेचा रंग देखील उजळतो.

पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते

कोरफड जेलमुळे त्वचेवरील रोमछिद्रे स्वच्छ होतात. यामुळे आपली त्वचा तरुण राहते. यातील औषधी गुणधर्मामुळे रोमछिद्रे घट्ट राहतात. कोरफडीमध्ये अँटी अ‍ॅक्ने गुणधर्म आहेत. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांचा त्रास कमी होतो तसंच आपल्या त्वचेचा रंग देखील उजळतो. नियमित योग्य पद्धतीनं वापर केल्यास त्वचेवरील पिगमेंटेशनची समस्याही दूर होऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button