breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘सहयोगनगर’ला रेडझोन जागेतील दोनशे झाडांवर कु-हाड, एका नगरसेवकाच्या मदतीने प्लाॅटिंग जोरात

शेतीच्या नावावर झाडे तोडण्यास परवानगी, पण प्लाॅटिंग धंदा जोरात, गुंठ्याला 20 लाखाचा भाव

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

सहयोगनगर, तळवडे येथे शेती करण्याच्या नावावर महापालिकेच्या वृक्ष संवर्धन प्राधिकरणाकडून सुमारे दोनशे झाडे तोडण्याची परवानगी घेतली. प्रत्यक्षात त्या जागेवर प्लाॅटिंगचा धंदा जोरात सुरु असून गुंठ्याला 20 लाखाचा भाव वधारला आहे. यात सत्ताधारी एका नगरसेवकाने जागा मालकाला झाडे तोडण्याची परवानगी मिळवून देत तब्बल 20 गुंठे जागा लाटली आहे. दरम्यान, पालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीची दिशाभूल करुन दोनशे झाडावर कु-हाड चालविली असून मुख्यउद्यान अधिक्षकांनी मोलाचा हातभार लावला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील रेडझोन परिसरात नागरिकांची ढिवसाढवळ्या फसवणूक होत आहे. जागेची खरेदी विक्री करण्यास बंदी असतानाही रेडझोन परिसरात गुंठेवारीने बेकायदा प्लाॅटिंगचे पेव फुटले आहे. नदीच्या पुररेषेत, हरितपट्यात, सार्वजनिक आरक्षित जागेत, प्राधिकरणच्या संपादित क्षेत्रात आणि लष्कराने संरक्षित क्षेत्र घोषित केलेल्या जागांवर सर्रासपणे भूखंड पाडण्यात येत आहे. शहर व परिसरात जमिनीला सोन्याचे भाव आल्याने नागरिकाची फसवणूक होवू लागली आहे.

शेती आणि झाडाझुडपामुळे होणारा चिखल, अडीअडचणीच्या त्रासाने झाडे तोडण्याची परवानगी सहयोगनगर (तळवडे) येथील एकाने महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीकडून घेतली होती. मात्र, त्याठिकाणी शेती न करता प्लाॅटिंगचा धंदा जोरदार सुरु आहे. त्यामुळे दोनशे झाडांवर कु-हाळ कोसळली आहे. तसेच वृक्ष तोडण्याची परवानगी एका नगरसेवकाने मिळवून दिल्याची चर्चा असून त्यांनी तेथील सुमारे 20 गुंठे जागा वाजवी दराने खरेदी केली आहे.

मुख्यउद्यान अधिक्षकाकडून वृक्ष संवर्धन समितीची दिशाभूल

सहयोगनगर, (तळवडे) येथील रेडझोन परिसरात सुमारे दीड एकर जागेवरील अंदाजे दोनशे झाडे तोडण्यासाठी मुख्यउद्यान अधिक्षकांनी वृक्ष संवर्धन समितीची दिशाभूल केलेली आहे. शेती करण्यास सदरील जागेवरील झाडे तोडण्याची परवानगी मागण्यात आली. ती परवानगी वृक्ष संर्वधन समितीने परवानगी दिली. प्रत्यक्षात त्या जागेवर शेती न करता प्लाॅटिंगचा व्यवसाय करण्यात येवू लागला आहे. त्यामुळे मुख्यउद्यान अधिक्षकांची बदली करण्यात यावी, तसेच त्या अधिका-याची चाैकशी करुन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपकडून केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button