breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सलून व्यावसायिकांना शासनाने मदत करावी व दुकान उघडण्यासाठी सशर्त परवानगी द्यावी : नगरसेविका सिमा सावळे

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनामुळे मागील जवळपास अडीच महिन्यांपासुन आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेला सेवाभावी केशकर्तन (सलुन) व्यवसाय करणारा नाभिक (न्हावी) समाज पूर्णपणे हवालदिल झालेला आहे.  नाभिक बांधावांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सलुनची दुकाने ही भाड्याची असल्यामुळे त्यांना दुकानभाडे, लाईटबिल व कुटूंबाचा खर्च चालविणे आता अशक्य झाले आहे. या आर्थिक अडचणीमुळे हातावर पोट असणाऱ्या  सलुन दुकानदार व कारागीरांना शासनातर्फे किमान आर्थिक मदत मिळावी करीता जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नगरसेविका सिमा सावळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार  यांना निवेदनातून मागणी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोख्न्यासाठी देशभरात २५ मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतर मे महिन्यापासून लॉकडाऊनच्या नियमात टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यात आली व अनेक उद्योग व्यवसाय काही अटी-शर्तीच्या आधारे सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली. त्यानंतर १ जून पासून देशात अनलॉक १ ची प्रक्रिया सुरु करण्यात आली.  अनलॉक १  मध्ये काही जवळजवळ सर्वच प्रकारच्या व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही सलून व्यवसायिकांना दुकान उघडण्याची परवानगी शासनाने दिलेली नाही. यामुळे सलून व्यवसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नगरसेविका सिमा सावळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देऊन नाभिक (न्हावी) समाजाला  शासनाने मदत करावी अशी कळकळीची विनंती केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात सावळे यांनी म्हंटले आहे कि,  मागील जवळपास अडीच महिन्यांपासुन आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेला सेवाभावी केशकर्तन (सलुन) व्यवसाय पूर्णपणे बंद आहे.  सलुनची दुकाने ही भाड्याची असल्यामुळे त्यांना दुकानभाडे, लाईटबिल व कुटूंबाचा खर्च चालविणे आता अशक्य झाले आहे. त्यामुळे नाभिक बांधावांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ आलेली आहे. नाभिक समाजाच्या हितासाठी  शासनाने “केशशिल्पी मंडळाची” स्थापना यापूर्वी केली आहे. या मंडळाच्या वतीने केशकर्तन व्यवसाय करणाऱ्या लोकांना अशा अडचणीत मदत देण्यात यावी, अशी मागणी सावळे यांनी केली आहे. 

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाचा सामना करत हवालदिल झालेल्या केशकर्तन करणाऱ्या दुर्लक्षित नाभिक  समाजाच्या उपजीवीकेच्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी.  शासनाने सलून सुरु करण्यासाठी नियमावली तयार करून त्याच्या आधारे दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून नाभिक समाज निश्चितपणे कोरोना विषाणुचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करतील. तसेच सलुन कारागिरास स्वास्थ्य सुरक्षा कार्ड व रोग संरक्षण किट प्रशासनाने देऊन दुकान उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सावळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button